news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुरस्कार जाहीर ; प्रा. डॉ. राजकुमार पवार, श्रीकांत मेलगे, जयराम आलदर, प्रकाश पाटील, मनोज वेदपाठक, राजाराम दत्तू, अर्चना सलगर यांचेसह अनेक शिक्षक व शाळाही होणार पुरस्काराने सन्मानित

टीम लोकमन by टीम लोकमन
November 28, 2024
in शैक्षणिक
0
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुरस्कार जाहीर ; प्रा. डॉ. राजकुमार पवार, श्रीकांत मेलगे, जयराम आलदर, प्रकाश पाटील, मनोज वेदपाठक, राजाराम दत्तू, अर्चना सलगर यांचेसह अनेक शिक्षक व शाळाही होणार पुरस्काराने सन्मानित

टीम लोकमन मंगळवेढा |

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर प्रणित महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे मंगळवेढा तालुक्यातील पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सिंहगड कॉलेज कोर्टी रोड पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मंगळवेढा तालुकाध्यक्ष विकास मोरे सर व सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र माळी सर यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील विविध शाळांनी शैक्षणिक उपक्रम राबवून आपल्या शाळेचा नावलौकिक प्राप्त केलेल्या शाळांना कृतिशील आदर्श शाळा, विविध शाळातील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांच्यामध्ये नाविन्यपूर्ण रीतीने व्यवस्थापन करुन शाळा चांगल्या नावारुपाला आणल्या अशा मुख्याध्यापक प्राचार्यांना कृतिशील आदर्श मुख्याध्यापक, प्राचार्य पुरस्कार तसेच आपल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या मध्ये सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शाळेचे प्रशासकीय कामकाज वेळच्यावेळी करुन शाळेला प्रशासनामध्ये सहकार्य करणाऱ्या लिपिकांना कृतिशील आदर्श लिपिक व शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून शाळांमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचे काम करणाऱ्या सेवकांना आदर्श कृतिशील सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कृतिशील शाळा पुरस्कार

उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा हुन्नूर, श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती, गणेश विद्यालय गणेशवाडी

कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार

जयराम आलदर सर इंग्लिश स्कूल भोसे, राजाराम दत्तू सर माध्यमिक आश्रमशाळा येड्राव, सौ.अर्चना सलगर मॅडम ज्ञानदीप विद्यालय मंगळवेढा, मदगोंडा माळी सर माध्यमिक विद्यालय शिवनगी

कृतिशील शिक्षक / शिक्षिका पुरस्कार

आण्णासाहेब घाडगे सर श्री स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी, पांडूरंग लेंडवे सर शरदचंद्र विद्यालय मारापूर, उत्तम काळे सर श्री कामसिद्ध विद्यालय खुपसंगी, नागेश पाटील सर श्री रेवणसिद्ध स्वामी विद्यालय तळसंगी, सौ.सुवर्णा काळे मॅडम कै.बाबूराव जाधव विद्यालय धर्मगाव

कृतिशील कलाशिक्षक

मनोज वेदपाठक सर श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर, संजय शिखरे सर नूतन प्रशाला बोराळे, प्रकाश पाटील सर नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा

कृतिशील क्रीडाशिक्षक

महादेव जावीर सर विद्यानिकेतन हायस्कूल जालिहाळ, शिवशंकर स्वामी सर जवाहरलाल प्रशाला मंगळवेढा

कृतिशील सिनिअर कॉलेज प्राध्यापक

प्रा. डॉ. राजकुमार पवार सर
श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा

कृतिशील जुनिअर कॉलेज प्राध्यापक

चंद्रकांत सदाशिव डांगे सर शारदा सिद्धनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पाठखळ, भोरकडे बाळासाहेब बापू सर विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सलगर बुद्रुक

कृतिशील आयटीआय कॉलेज प्राध्यापक

मारुती बिराप्पा निमंगरे सर
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुंजेगाव

कृतिशील कृषी महाविद्यालय प्राध्यापक

प्रशांत काकासो बाबर सर
कवचाळे कृषी महाविद्यालय बोराळे

कृतिशील लिपिक

विठ्ठल घोगरे सर श्री सद्गुरु बागडे बाबा विद्यालय बावची, श्रीकांत दत्तात्रय मेलगे सर माध्यमिक आश्रमशाळा व जुनिअर कॉलेज बालाजीनगर

कृतिशील सेवक

प्रभाकर माने कै. श्रीपतराव माने विद्यालय लवंगी, बापूराव गायकवाड श्री वेताळ विद्यामंदिर शिरसी

वरील सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

अभिमानास्पद ! मंगळवेढ्यातील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेला महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील शाळा पुरस्कार जाहीर

Next Post

भीषण अपघात ! राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार तर अनेक प्रवासी गंभीर जखमी ; अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Next Post
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

भीषण अपघात ! राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार तर अनेक प्रवासी गंभीर जखमी ; अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group