टीम लोकमन मरवडे |
तळसंगी तालुका मंगळवेढा येथील माजी सैनिक प्रकाश धोंडाप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूर येथील मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक सोमनाथ पाटील यांचे ते वडील होत.
त्यांचेवर मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, कारखान्याचे माजी संचालक बसवेश्वर पाटील, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अशोक मलगोंडे, माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी मेजर, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक चंगेजखान इनामदार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांचेसह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, मरवडे, तळसंगी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












