news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार ; प्रकृती गंभीर, मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु, राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
October 12, 2024
in क्राईम
0
मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार ; प्रकृती गंभीर, मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु, राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्धिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन अज्ञातांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

या गोळीबारात सिद्धिकी यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचेवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बाबा सिद्धिकी यांनी कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज शनिवारी सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्धिकी हे त्यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर थांबलेले असताना त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. वांद्रे पूर्व येथे ही गोळीबाराची घटना घडली आहे.

सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करुन अज्ञात मारेकरी वेगात पळून गेले. सिद्धिकी यांच्या छातीवर एक गोळी लागल्याने सिद्धिकी रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. निर्मलनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous Post

शरद पवार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात नवा डाव टाकण्याच्या तयारीत ; देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रशांत परिचारक तुतारी हाती घेऊन विद्यमान आमदार समाधान आवताडेंसमोर तगडे आव्हान निर्माण करणार?

Next Post

अजितदादांचा शिलेदार सांगोला विधानसभेच्या मैदानात उतरताच विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील ॲक्शन मोडवर ; ‘सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसं’ हा मुंबईतील सांगोलकरांचा आज स्नेहबंधन मेळावा, सांगोल्यात विधानसभेला तिरंगी लढत अटळ?

अजितदादांचा शिलेदार सांगोला विधानसभेच्या मैदानात उतरताच विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील ॲक्शन मोडवर ; 'सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसं' हा मुंबईतील सांगोलकरांचा आज स्नेहबंधन मेळावा, सांगोल्यात विधानसभेला तिरंगी लढत अटळ?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group