टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील रहिवासी व भारतीय डाक विभागातील सेवानिवृत्त पोस्टमास्तर चंद्रकांत शिवगोंडा लिगाडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार मोठा आहे. त्यांनी भारतीय डाक विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा केली. दोनच विभागांमध्ये ते सर्वाधिक काळ कार्यरत होते. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा येथील प्राध्यापक व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. रेवणसिद्ध लिगाडे यांचे ते वडील होत.
चंद्रकांत लिगाडे यांचेवर डोणज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक मलगोंडे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांचेसह श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.











