news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! तीन टर्म आमदार राहिलेल्या ‘या’ माजी आमदारावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल ; मध्यरात्री पोलिसांनी माजी आमदाराला केली अटक, राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
October 8, 2024
in क्राईम
0
संतापजनक ! मध्यरात्री दुकान उघडून चहा व सिगारेट देण्यास नकार दिल्याने नामांकित डॉक्टरची महिलेला विवस्त्र करून मारहाण ; महिला गंभीर जखमी, फरार डॉक्टरचा पोलिसांकडून शोध सुरू, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

 

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या व नुकतेच नामकरण झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटकही केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भानुदास मुरकुटे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ मानले जाते.

त्यांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे. पीडित महिला 2019 मध्ये भानुदास मुरकुटे यांच्याकडे कामाला होती. त्यावेळी मुरकुटे यांनी विविध प्रलोभन देऊन आपल्यावर वारंवार लैंगिक केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

यासंदर्भात तिने सोमवारी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्री त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. मात्र अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भानुदास मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत तीनवेळा ते काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी मुरकुटे यांनी जवळपास 25 ते 26 हजारांच्या मताधिक्यांनी विजय संपादन केला होता.

सध्या ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. आधी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्यतंरी मुरकुटे यांनी जिल्ह्यातील 35 सरपंचासह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. अलिकडेच कारखान्यातील ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Previous Post

महाराष्ट्र भाजपचे बिग बॉस देवेंद्र फडणवीसांच्या मंगळवेढ्यातील कार्यक्रमाला प्रशांत परिचारकांची दांडी ; जिल्ह्यात चर्चांना उधान, लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट होणार, शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची शक्यता?

Next Post

आमचं ठरलंय ! सस्पेन्स संपला…अखेर उपमुख्यमंत्री अजितदादांचा मतदारसंघ ठरला ; महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

Next Post
आमचं ठरलंय ! सस्पेन्स संपला…अखेर उपमुख्यमंत्री अजितदादांचा मतदारसंघ ठरला ; महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

आमचं ठरलंय ! सस्पेन्स संपला...अखेर उपमुख्यमंत्री अजितदादांचा मतदारसंघ ठरला ; महाराष्ट्रातील 'या' विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

November 6, 2025
तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

October 27, 2025
आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती

आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती

October 2, 2025
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

September 25, 2025
कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

September 23, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

September 22, 2025
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group