टीम लोकमन मंगळवेढा |
बालरंगभूमी परिषद शाखा मंगळवेढा, शिवशंभो प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे आज सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव नवरात्रीचा…जागर स्त्रीशक्तीचा… नवरात्री उत्सवानिमित्त बालरंगभूमी परिषद मंगळवेढा शाखेच्या अध्यक्षा व शिवशंभो प्रतिष्ठानच्या चेअरमन तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेसाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा ॲड.नीलम शिर्के उपस्थित राहणार आहेत.
नृत्य स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काढले जाणार आहेत. यासाठी गजानन रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने 7001 रुपयांचे प्रथम पारितोषिक, 5001 रुपयांचे द्वितीय पारितोषिक व 3001 रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच दिया ड्रेस अँड साडी सेंटर, बेकर्स गॅलरी, हॉटेल स्वाद, राजवीर बुक डेपो, महालक्ष्मी नाष्टा सेंटर व शिवशंभो पतसंस्था यांचेवतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी महिलांनी सरस्वती क्षीरसागर 7887706182, सारिका चव्हाण 9028548849, रेश्मा गुंगे 9112035001, स्वाती दिवसे 9860105201 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी. असे आवाहन संयोजिका तेजस्विनी कदम यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.










