news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश ; राज्यातील नेत्यांचा तुतारीकडे ओढा कायम

टीम लोकमन by टीम लोकमन
September 25, 2024
in राजकीय
0
माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश ; राज्यातील नेत्यांचा तुतारीकडे ओढा कायम

टीम लोकमन नाशिक |

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुनिता चारोस्कर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मन:पूर्वक स्वागत केले. आदिवासी समाजातील स्त्री एक उत्तम वक्ता आहे, त्यांचे भाषण ऐकून हे अनुभवले असे सागंत जयंत पाटील यांनी सुनिता चारोस्कर यांचे कौतुक केले.

यावेळी जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले की, अनेक प्रश्न आहेत. स्थानिकांना रोजगार नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजना अपूर्ण राहिलेल्या आहेत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, दूध उत्पादकता घटली आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, इतर कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना येथील वळण बंदरांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती.

आपले सरकार आल्यावर पाणी व्यवस्थापन आणि इतर सर्व प्रश्नांना सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला जाईल. एक सालस, संयमी, निष्ठावंत अशा भगरे सरांना तुम्ही लोकसभेत निवडून दिले. आता विधानसभेसाठी देखील आपण असाच उमेदवार शोधून त्यास बहुमताने निवडून द्यायचे आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, दिंडोरीकरांनी लोकसभेला एक हिरा निवडून दिलेला आहे. पण लक्षात ठेवा विधानसभा अजून बाकी आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही हे आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी असलेल्या भागांत गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी एक पैशाचाही निधी आलेला नाही. पण योजनांमधून हाच लोकांचा पैसा आज मते खरेदी करण्यासाठी वापरला जातोय.

हरियाणात आता निवडणुका चालू आहेत, मात्र लोकप्रतिनिधी यावेळी तिथल्या शेतकऱ्यांना तोंड कसं दाखवायचं या चिंतेत आहेत. कारण जेव्हा हे शेतकरी दिल्लीला आले होते तेव्हा त्यांचं स्वागत कसं केलं हे तुम्ही पाहिलं आहेच. कांद्यावरची निर्यातबंदीही तुम्ही अशीच लक्षात ठेवा. मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आपल्या आई-बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत या मागण्यांवर ठाम रहा. खुद्द गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वाढते गुन्हे पाहिले तरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच कदाचित देशभरातील निवडणुका सोडून केंद्रीय गृहमंत्री उद्या नाशिकला येत आहेत. जर केंद्रीय नेतृत्वाचाच राज्यातील नेतृत्वावर विश्वास नसेल तर त्या लोकांवर आपण तर कसा विश्वास ठेवणार?

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम शेटे, हेमंत टकले, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

मराठा आरक्षण आंदोलन ! अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग ; शरद पवारांचे विश्वासू शिलेदार व राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे अचानक मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं अंतरवाली सराटीत ?

Next Post

गुड न्यूज ! एसटीच्या चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता ; उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा अभिनव उपक्रम, वाढीव उत्पन्नावर मिळणार रोख रक्कम, चालक वाहकांमध्ये उत्साह

Next Post
महाराष्ट्रात पुन्हा लालपरीची चाके थांबणार, एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत ; 2021 मध्ये झाला होता सलग 54 दिवस संप, काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

गुड न्यूज ! एसटीच्या चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता ; उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा अभिनव उपक्रम, वाढीव उत्पन्नावर मिळणार रोख रक्कम, चालक वाहकांमध्ये उत्साह

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group