news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुरुजींचे आंदोलन ! राज्यातील 40 हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार ; महाराष्ट्रातील पावणेदोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर, नेमके प्रकरण आहे तरी काय?

टीम लोकमन by टीम लोकमन
September 25, 2024
in शैक्षणिक
0
गुरुजींचे आंदोलन ! राज्यातील 40 हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार ; महाराष्ट्रातील पावणेदोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर, नेमके प्रकरण आहे तरी काय?

मंगळवेढा : अभिजीत बने

विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असल्याने अंदाजे 40 हजार शाळा आज बंद राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

राज्यातील गुरुजींच्या या आंदोलनामुळे राज्‍यातील 2 लाख विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक भवितव्य आंधारात येणार आहे. राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.

सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाने हे दोन्‍ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्वच शिक्षक आंदोलनात उतरले आहेत.

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यातील शिक्षक आज आंदोलन करणार आहेत. शिक्षक संघटनातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश ठिकाणी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सॲप ग्रुप सोडणे, काळी फित लावून काम करणे, अशाप्रकारचे विरोध दर्शवण्यात आले होते. मात्र आता शिक्षकांनी एक दिवसांची रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्याचे ठरवल्याने त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश शाळांवर होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही यामुळे होणार आहे.

सामूहिक नेतृत्वाखाली निघणारा आजचा मोर्चा ऐतिहासिक होणार

वर्षानुवर्षे तेच तेच प्रश्न घेऊन आम्ही शासनाकडे आक्रोश करतोय. परंतु शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. या शासनाला जागे करण्यासाठी, गोरगरिबांच्या मराठी शाळा टिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या. या मागणीसाठी आज जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शंभर टक्के बंद असणार आहेत.

सौ. ज्योती सचिन कलुबर्मे
जिल्हाध्यक्षा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सोलापूर

Previous Post

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरपुरात टोकन दर्शनाची होणार सोय, 6 हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप ; 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी : आमदार समाधान आवताडे

Next Post

मराठा आरक्षण आंदोलन ! अंतरवाली सराटीत मध्यरात्री हालचालींना वेग ; शरद पवारांचे विश्वासू शिलेदार व राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे अचानक मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं अंतरवाली सराटीत ?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group