news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘इंजिनियर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा ; प्राचार्य तानाजी बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
September 23, 2024
in शैक्षणिक
0
शाब्बास पोरांनो ! उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

टीम लोकमन मंगळवेढा |

उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशाला ही मंगळवेढ्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविणारी एक नामांकित प्रशाला होय. प्रशालेत विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. 15 सप्टेंबर सर्वत्र ‘इंजिनियर डे’ म्हणून साजरा केला जातो. याचेच अवचित्य साधून प्रशालेत ‘इंजिनिअर डे ‘चा कार्यक्रम आयोजित केला होता.

यासाठी प्रशालेत नेहमी घेतल्या जाणाऱ्या ‘स्कॉलर चाट’ या उपक्रमांतर्गत प्रशालेत तानाजी बुरुंगले प्राचार्य, फेबटेक टेकनिकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च पौंलिटेकनिक, सांगोला यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचा यथोचित सत्कार प्राचार्य सुधीर पवार यांचेहस्ते करण्यात आला. पाहुण्यांची ओळख सौ.अनिता केदार यांनी करून दिली.

त्यानंतर तानाजी बुरुंगले यांनी इंजिनियर म्हणजे काय त्यासाठी कोणत्या पदव्या घ्याव्या लागतात व इंजिनियरचे विविध प्रकार याविषयी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांच्यात सुसंवाद सुरू झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे प्रमुख पाहुण्यांनी अतिशय समर्पक शब्दात दिली. त्यांच्या उत्तराने विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले.

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Previous Post

मंगळवेढ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कायदे विषयक शिबिर संपन्न ; न्यायाधीश एस. एन. गंगवाल-शाह यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

राष्ट्रवादी पुन्हा ! सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे ‘हे’ माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पक्षप्रवेश करून शरद पवार पुन्हा पुनर्वसन करणार ?

Next Post
राष्ट्रवादी पुन्हा ! सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे ‘हे’ माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पक्षप्रवेश करून शरद पवार पुन्हा पुनर्वसन करणार ?

राष्ट्रवादी पुन्हा ! सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे 'हे' माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पक्षप्रवेश करून शरद पवार पुन्हा पुनर्वसन करणार ?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group