टीम लोकमन मंगळवेढा |
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वार्षिक दिनदर्शिकेप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर एम. एस. आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यू. पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक संघ मंगळवेढा येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरीकांचे हक्क व ज्येष्ठ नागरीकांचे विविध कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्रीधर भोसले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने यांनी केले. त्यांनी मृत्यृपत्राबाबत, ज्येष्ठ नागरीकांनी आपली व आपल्या मालमत्तेची कशी काळजी घ्यावी तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी उपलब्ध असलेल्या पोटगीच्या तरतुदीची माहिती दिली.
ॲड. एस. आर. पवार यांनी ज्येष्ठ नागरीक कायदा 2023, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, समस्या, मानवाधिकार, जगण्याचा अधिकार, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकिय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यतिराज वाकळे यांनी केले तर तुकाराम आवताडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, व्ही. डी. मोरे, विधीज्ञ संघ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने, ॲड. एस. आर. पवार, ॲड. डी. एस. माने तसेच विठठल शिवशरण, सिध्देश्वर पटणशेटटी, पोपट महामुरे, शंकर इकारे, वसंत गुंड, नामदेव पोळ, प्रकाश स्वामी, दिलीप कोष्टी, श्रीमती. अजीता भोसले, श्रीमती. सुनंदा आवताडे यांचेसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरीक यांनी उपस्थित राहुन कायदेविषयक शिबीराचा लाभ घेतला.










