news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! भिवापूर जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; ट्रॅव्हल्स मधील चौघांचा जागीच मृत्यू, तर 22 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

टीम लोकमन by टीम लोकमन
September 5, 2024
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! भिवापूर जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; ट्रॅव्हल्स मधील चौघांचा जागीच मृत्यू, तर 22 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

टीम लोकमन मंगळवेढा |

उमरेड-भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील तास शिवारात एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील चार प्रवाशांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 22 पेक्षाही अधिक प्रवासी गंभीर जखमी असून, यातील 10 पेक्षा जास्त गंभीर जखमी प्रवाशांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर अपघात गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास झाला.

सदर अपघातातील मृतांची व जखमींची नावे कळू शकली नाहीत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक MH 49 J 8616 ही माँ दुर्गा नामक ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन नागपूर येथून भिवापूरकडे भरधाव वेगात येत होती. यादरम्यान, शहरालगतच्या तास शिवारातील बसथांबा परिसरात असलेल्या पाणटपरीशेजारी रेशनचे धान्य भरलेला MH 31 AP 2966 हा ट्रक थांबलेला होता. यावेळी भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकसह पाणटपरीला धडक देत ट्रॅव्हल्स थेट शेतात शिरली.

या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील एक महिला, एक मुलगा व दोन पुरुष असे चौघे थेट ट्रॅव्हल्सच्या खाली आले. यातील दोघांच्या शरीरावर तर अक्षरश: ट्रॅव्हल्सचे चाक होते. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दोन जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी 10 पेक्षाही अधिक गंभीर जखमींना नागपूरला पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.

अपघात इतका भयानक होता की, ट्रॅव्हलच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला असून समोरची दोन्ही चाके सुद्धा निघाली आहेत. मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी एक, तर कन्हाळगाव ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथील एकाचा समावेश आहे. अन्य एकाची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. अपघातामुळे राष्ट्रीयमार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

Previous Post

खेळ पैठणीचा ! आज मंगळवेढ्यात रंगणार रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी आयोजित ‘नाच गं घुमा’ हा महिलांसाठीचा श्रावण सोहळा ; आज ठरणार कोण होणार ‘मंगळवेढा क्वीन’, महिलांमध्ये प्रचंड उत्साह, नगराध्यक्षा अरुणा माळी, असिस्टंट गव्हर्नर पूनम देवदास यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

गणेश चतुर्थी 2024 ! शनिवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे वाजत गाजत होतेय आगमन ; उद्या ‘या’ वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना कधी करावी? पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितला शुभमुहूर्त

गणेश चतुर्थी 2024 ! शनिवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे वाजत गाजत होतेय आगमन ; उद्या 'या' वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना कधी करावी? पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितला शुभमुहूर्त

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group