news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

29 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी व्हा ; सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांचे आवाहन

शिक्षक नेते सुरेश पवार यांनी जागविला कर्मचारी समन्वय समितीचा इतिहास

टीम लोकमन by टीम लोकमन
August 28, 2024
in ताज्या घडामोडी
0
29 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी व्हा ; सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांचे आवाहन

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

राज्यातील विविध आस्थापनेत काम करणाऱ्या जवळपास 17 लाख कर्मचारी बांधवांचे असंख्य प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले. हंगाम बघून पेरणीसाठी तिफण बाहेर काढली पाहिजे. नेमकी हिच वेळ साधून हा संप पुकारण्यात आला आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विषय असतात मात्र आर्थिक प्रश्न आणि धोरणात्मक निर्णय हे सामुहिक स्वरुपाचे असतात. 1977 मध्ये समन्वय समितीने 54 दिवस संप निग्रहाने चालविला, मात्र राज्य सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. शेवटी संप मागे घ्यावा लागला. मात्र या संपामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय पटलावर खूप मोठा परिणाम झाला.

राज्यातील स्व. वसंतदादा पाटील यांचे सरकार कोसळले आणि पुलोद आघाडीचे सरकार आले. या घडामोडीमध्ये मंत्रालयातील अनेक राजपत्रित अधिकारी, विविध संघटनांच्या नेत्यांनी आमदारांची Magic Figer पुलोद आघाडीकडे उभी करण्यात पडद्या मागून खूप मोठी कामगिरी बजावली हे सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रातील राजकीय सत्ता बदल झाल्यानंतर गठीत झालेल्या सरकारने पहिल्या कँबिनेट बैठकीत केंद्र सरकार च्या कर्मचाऱ्यांना मिळणारी महागाई, भत्ते व इतर लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या जीवनात आज जे आर्थिक स्थैर्य आले आहे. ही पुण्याई त्या 54 दिवसांच्या संपात दडलेली आहे. एकूण कर्मचारी संख्येमध्ये साधारणपणे 15% संख्या शिक्षकांची आहे.

1977 च्या संपात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या इतर संघटना मुख्यमंत्र्यांनी डोळे वठारताच संपातून 27 व्या दिवशी बाहेर पडल्या मात्र शिक्षक समिती शेवटच्या दिवसापर्यंत संपात ठामपणे पाय रोवून उभी राहिली. म्हणूनच 1977 पासून शिक्षक समिती ही समन्वय समितीचा अविभाज्य घटक असलेली एकमेव शिक्षक संघटना पूर्वीपासून राहिलेली आहे. मात्र इतर काही संघटनांचा राज्य सरकार मागील 40 वर्षापासून कर्मचाऱ्यांची एकजूट फोडण्यासाठी खुबीने उपयोग करीत आले आहे. अशा संघटनांचे नेते आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपली संघटना खंबीर असल्याचे गळा काढून सांगतात. समन्वय समितीच्या माध्यमातून संप किंवा अन्य आंदोलन उभारले गेल्यावर आम्ही त्यात सहभागी नाही असे सगळ्यात पुढे येऊन सांगतात.

वास्तविक ज्यांनी आंदोलनाची हाक दिली त्याच संघटनांनी यावर भाष्य करणे उचित ठरते. मात्र राज्य समन्वय समितीमध्ये अंतर्भूत नसलेल्या संघटनांनी काही प्रसंगात भाष्य करणे टाळले पाहिजे अथवा कर्मचारी हितासाठी सोयिस्कर मौन बाळगले पाहिजे. जुनी पेन्शन ही तर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहेच. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पेन्शन योजने संदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यातील बारकावे आणि फायदे – तोटे अभ्यासले पाहिजेत. शिवाय याबाबतीत राज्य सरकारने विशिष्ट मुदतीत आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. त्यादृष्टीने हा लढा तीव्र केला पाहिजे. याशिवाय असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडले पाहिजे.

समूह शाळा धोरण, दत्तक शाळा योजना, विद्यार्थी गणवेश योजना, आश्वासित प्रगती योजना, वेतन त्रुटी दुरुस्ती, अशैक्षणिक कामे, अवास्तव उपक्रम बंद करणे, रिक्त पदे भरली जावीत असे काही प्रश्न या संपाच्या माध्यमातून ऐरणीवर आले आहेत. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांच्या सामुहिक हिताचे प्रश्न देखील सोडवून घेण्याची संधी या संपामुळे साधली जाणार आहे. म्हणूनच मनाचा निग्रह करुन जुन्या पिढीतील कर्मचाऱ्यांचा, एस.टी. तसेच अंगणवाडी ताईंचा खमकेपणा डोळ्यासमोर ठेवून या संपात सहभागी होवूया. संपात सहभागी झाल्यावर काही कारवाई होईल का ? कसला नेभळट प्रश्न मनात येऊ न देता हिंमतीने या संपात सहभागी व्हा !

कोण सहभागी आहे…. कोण नाही याची पडताळणी करत बसण्यापेक्षा स्वतः पासून सुरुवात करुया इतकेच !

सुरेश पवार
जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती, सोलापूर
7057475610

Previous Post

मोठी बातमी ! नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन ; हैदराबाद मधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Next Post

पावसाळ्यातील त्वचेची आणि केसांची काळजी ; नैसर्गिक उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय : डॉ. किर्ती समीर गोलवळकर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group