टीम लोकमन माडग्याळ |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्यभर अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा काढली जात आहे. धनगर महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, धनगर समाज प्रबोधनकार, क्रांतीसुर्य आण्णासाहेब डांगे व धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यभर संदेश यात्रा फिरत आहे.
या यात्रेचे शुक्रवारी दुपारी माडग्याळ येथे आगमन झाले होते यावेळी माडग्याळ मधील धनगर समाज बांधवांनी संदेश यात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री-पुरुष समानता, गोरगरीब लोकांच्या विषयी कळवळा व तळमळा असे मोठे कृतिशील कार्य केले या कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने केला असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य सोमण्णा हाक्के यांनी केले.
यावेळी नगरसेवक विष्णू माने, जि.प.सदस्य सजंय पाटील, शंकर वगरे सर, कुंडलिक दुधाळ, माजी प.स.सदस्य.सोमाण्णा हाक्के, लक्ष्मण माळी, प्रेमनाथ चौगुले, लकडेवाडी सरपंच एकनाथ बडंगर ,सिद्धाप्पा पुजारी, परशुराम बडंगर, शिवानंद हाक्के, नाना कटरे, व्हस्पेट सरपंच सौ.पुनम तुराई, भगवान तुराई व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








