news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडली सदाभाऊंची साथ, हाती घेतली तुतारी ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच, विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली

टीम लोकमन by टीम लोकमन
August 4, 2024
in राजकीय
0
मोठी बातमी ! शरद पवारांना मोठा दिलासा, ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, तुतारीच्या वाटचालीतील मोठा अडथळा दूर

 

टीम लोकमन मंगळवेढा |

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा स्वगृही शरद पवारांसोबत येताना दिसत आहेत. त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.

माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. शिंदे यांचा पक्षप्रवेश रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी चळवळीत काम करत आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. शेतकरी चळवळीतील नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात केली होती.

शरद जोशी यांना प्रेरणास्थान मानून भानुदास यांनी दौंड तालुक्यासह राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. भानुदास शिंदे हे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. शरद जोशी तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी अतिशय उठावदार काम केले आहे. भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने दौंडमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढली असून भाजप आमदार राहुल कुल यांच्यासाठी देखील हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

शरद पवारांचे उपमुख्यमंत्री अजितदादांना धक्क्यांवर धक्के

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मोठा धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

प्रवीण माने यांच्या शरद पवार गटातील प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. माने यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने इंदापूर तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात तुतारी वाजणार असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. यापुढेही असे अनेक धक्के महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळणार आहेत.

Previous Post

मोठी बातमी ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 90 टक्क्यांवर, प्रशासनाकडून भीमा व सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; आज उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार

Next Post

सांगण्याजोगे ! ‘ना वशिला ना ओळख थेट मिळतेय वैद्यकीय मदत’ ; गरीब व गरजु रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरतोय आशेचा किरण, 2 वर्षात 36 हजारपेक्षा जास्त रुग्णांना 301 कोटींची विक्रमी मदत

Next Post
सांगण्याजोगे ! ‘ना वशिला ना ओळख थेट मिळतेय वैद्यकीय मदत’ ; गरीब व गरजु रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरतोय आशेचा किरण, 2 वर्षात 36 हजारपेक्षा जास्त रुग्णांना 301 कोटींची विक्रमी मदत

सांगण्याजोगे ! 'ना वशिला ना ओळख थेट मिळतेय वैद्यकीय मदत' ; गरीब व गरजु रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ठरतोय आशेचा किरण, 2 वर्षात 36 हजारपेक्षा जास्त रुग्णांना 301 कोटींची विक्रमी मदत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group