news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झालेत त्यामुळे यावेळी तमनगौडा रविपाटील हेच जतचे आमदार : माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यतनाळ

टीम लोकमन by टीम लोकमन
August 3, 2024
in राजकीय
0
ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झालेत त्यामुळे यावेळी तमनगौडा रविपाटील हेच जतचे आमदार : माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यतनाळ

जत : पांडुरंग कोळळी

देशात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झाले आहेत. यावेळी जतमधून पदयात्रा काढणारे तम्मनगौडा रवीपाटील हे निश्चितपणे आमदार होतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व विजयपूर येथील आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी बिळूर येथील संवाद सभेत बोलताना व्यक्त केले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद यात्रेनिमित्त येथे जाहीर संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बसनगौडा पाटील-यतनाळ हे उपस्थित होते.

त्यावेळी ककमरी मठाधिपती श्री गुरूलिंग जंगम स्वामीजी, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक प्रसन्न आजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बसनगौडा पाटील म्हणाले की, आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली आहे त्यांनी त्यांनी क्रांती केले आहे. तम्मनगौडा रवीपाटील यांची जनकल्याण संवाद यात्रा म्हणजे जत तालुक्यातील क्रांतीचे बीज आहे. अशा तरुण युवा नेत्याला विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी जनतेवर आहे. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारस करणार आहे. तसेच स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे.

जत तालुक्याला पाणी देतो म्हणून कर्नाटकातील मंत्री एम बी पाटील व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना खेळवले आहे. जत तालुक्याच्या सीमावर्ती भागास पाणी देण्याच्या मागणीसाठी जनतेने कर्नाटक जाण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र तम्मनगौडा रवीपाटील यांना तुम्ही आमदार करा, पाणी तर येईलच शिवाय जत तालुक्याचे नंदनवन होईल.

तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुक्याचा विकास खुंटला आहे. इथल्या तरुणांना बेरोजगारांना व महिलांना काम देईल असा एकही कारखाना तालुक्यात उभारला नाही. इथल्या शेतकऱ्यांच्या वेदना व दुःख अत्यंत तीव्र आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने अनेक प्रश्न मांडले आहेत. जत तालुक्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक भूमिपुत्र म्हणून आपण पायी प्रवास करीत आहे.

गुरुलिंग जंगम स्वामीजी यांनीही यावेळी आशीर्वाद दिले. यावेळी बसवसेना अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जत तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने तम्मणगौडा रवीपाटील प्रयत्न करत असल्याचे सांगून यासाठीच तम्मणगौडा आणि बसणगौडा एकत्र आल्याचे सांगितले. ऐतिहासिक जनकल्याण संवाद यात्रा बसर्गीहून आज शुक्रवारी सायंकाळी बिळूर येथे दाखल झाली. त्यावेळी बिळूर ग्रामस्थांनी पदयात्रेचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले. वाद्यांच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या पदयात्रेचे येथील काळभैरवनाथ मंदिरासमोर संवाद सभेत रूपांतर झाले. या सभेला ‌माजी जिल्हा परिषद सदस्य रामन्ना जीवन्नावर, बी. एस. घेज्जी, शिवसेना नेते निवृत्ती शिंदे सरकार, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनिल पोतदार, माजी सरपंच नागनगौडा पाटील, महादेव कलुती, माजी नगरसेवक टीमुभाई एडके, हणमंत गडदे, कामण्णा बंडगर, सागर बिज्जरगी, सरपंच रामनींग निवर्गी, रामचंद्र पाटील, श्रीशैल कोटगोंड, मल्लिकार्जुन कोटगोंड, पिरू कोळी उपस्थित होते.

बसनगौडा पाटील-यतनाळ यांच्या संवाद सभेला बिळूर येथे प्रचंड गर्दी झाली होती. जय श्रीराम च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर तम्मनगौडा रवीपाटील युथ फाऊंडेशन यांच्यावतीने सुमारे 2000 महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले.

पदयात्रा सांगता सभेला पुन्हा येणार : बसनगौडा पाटील

जन कल्याण संवाद पदयात्रेच्या सांगता सभा कधी आहे. ते सांगा त्या सभेला आपण पुन्हा येणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यांनी सांगितले.

Previous Post

कर्नाटकच्या माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांची भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सार्थक हिट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Next Post

बंजारा समाज व भटक्या विमुक्त जाती जमाती मेळावा व जाहीर सत्कार समारंभ ; आमदार विक्रमसिंह सावंत व खासदार विशाल पाटील यांचे जंगी स्वागत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group