टीम लोकमन मंगळवेढा |
ब्रह्मपुरी ता मंगळवेढा येथील श्रद्धा संतोष देशमुखे हिचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ती 15 वर्षांची होती.
श्रद्धा ही मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.
ती मंगळवेढा भूमिअभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकारी संतोष देशमुखे यांची कन्या होत. तिच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. तिच्या अकाली निधनाने ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळवळ व्यक्त केली जात आहे.








