news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

दादांना धक्का ! राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार अपात्र होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

टीम लोकमन by टीम लोकमन
July 29, 2024
in राजकीय
0
मोठी बातमी ! अजितदादांशी संबंधित ‘या’ घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल परंतु हे मॅटर टॅग होणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अपात्रतेच्या निकालाविरोधातील याचिकेवर विधाननसभा निवडणुकीआधी निकाल यावा. अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याला अजित पवार यांनी आम्ही हायकोर्टात असल्याने आमदारांना नोटीस देता येणार नाही असे म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल. येत्या 3 सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 41 आमदारांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असे विचारले असल्याचे शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात 6 ॲागस्ट हि तारीख घेतली आहे. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल. सप्टेंबर अखेर पर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचे आहे. म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, आमचे म्हणणे हेच होते की नोटीस द्यावी. अजित पवारांचे म्हणणे होते की आम्ही हायकोर्टात आहोत. नोटीस देता येणार नाही. अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचे नव्हते. हायकोर्टात जायचे होते. कारण या प्रकरणाला उशीर करायचा होता.

सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दिलेल्या निर्णयाची ही थट्टा आहे. कोर्ट म्हणाले, हे आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केसची सुनावणी होणार आहे. आमचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणूकीपूर्वीच यावर निकाल यायला पाहीजे. कारण ही लोकशाहीची हत्या आहे. 3 सप्टेंबरला सुनावणी होईल. त्यापूर्वी उत्तर दाखल करावे लागणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Previous Post

लखपती दीदी ! महिलांना व्यवसायासाठी आता मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; 9 कोटींपेक्षा अधिक महिलांनी घेतला या योजनेचा लाभ, केंद्र सरकारची लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

Next Post

मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावविकास आघाडीच्या अंजली हरिदास चौधरी यांची निवड

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group