news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सैराटची पुनरावृत्ती ! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या ; पुरोगामी महाराष्ट्रात जातीव्यवस्थेचा आणखी एक बळी, हृदयद्रावक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
July 27, 2024
in क्राईम
0
सैराटची पुनरावृत्ती ! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या ; पुरोगामी महाराष्ट्रात जातीव्यवस्थेचा आणखी एक बळी, हृदयद्रावक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी प्रेमविवाह केला. सुखी संसाराची अनेक मोठी स्वप्न त्यांनी पाहिली. पण ही सगळी स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत. कारण विद्याच्या कुटुंबियांनी अमितची हत्या केली आहे. या घटनेने केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघेही एकत्र वाढले. पुढे या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. म्हणून संस्कृती आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात येत या दोघांनी लग्न केले. रजिस्टर मॅरेज केले. पण लग्नाला एक महिना होताच अमित साळुंखेची हत्या केली गेली अन् ती हत्यादेखील विद्याच्या भावानेच केली आहे.

अमितच्या हत्येवेळी नेमके काय झाले?

संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी पबजीवरच त्याला घराबाहेर बोलावून घेतले. अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला. घराजवळच्या झाडाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रत्नाने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडेपण पोटाच्या बाहेर आले.

अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिले तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 14 जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केली आहे.

Previous Post

माजी सैनिक संघटना व वारी परिवाराच्या वतीने कारगिल युद्धातील सैनिकांना मंगळवेढ्यात श्रद्धांजली अर्पण ; महेश ढवाण, मल्लय्या स्वामी, सतीश दत्तू, चंगेजखान इनामदार, दिगंबर भगरे यांची उपस्थिती

Next Post

काळ आला होता पण…. ! सलून चालकाला जाग आली आणि वाचले शेकडो लोकांचे प्राण ; बेलापूर मध्ये तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना, अनेक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती

Next Post
काळ आला होता पण…. ! सलून चालकाला जाग आली आणि वाचले शेकडो लोकांचे प्राण ; बेलापूर मध्ये तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना, अनेक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती

काळ आला होता पण.... ! सलून चालकाला जाग आली आणि वाचले शेकडो लोकांचे प्राण ; बेलापूर मध्ये तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना, अनेक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group