news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण अखेर प्लसमध्ये, 5 दिवसांत धरण शंभरी गाठण्याची शक्यता ; सोलापूरला मोठा दिलासा, जिल्ह्यातील शेतकरी आनंदी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 26, 2024
in ताज्या घडामोडी
0
काळाचा घाला ! उजनीतील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडले ; नातेवाईकांचा आक्रोश, एकाचा शोध अद्यापही सुरूच

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे उजनी धरण अखेर प्लसमध्ये आले आहे. आज सकाळी 9 वाजता धरणाने शू्न्य पातळी ओलांडली आहे. ऐतिहासिक नीचांकी पातळीनंतर केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे. गेल्या 54 दिवसात धरणात तब्बल 33 टीएमसी पाणी आले आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास धरण पुढील 5 दिवसात 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा मायनसमधून प्लसमध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील धरणासाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.

उजनी धरणात 1 लाख 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु

ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठल्यानंतर केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे. असाच पाऊस पुढील चार ते पाच दिवस राहिल्यास उजनी धरण या पाच दिवसात 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात 1 लाख 60 हजार क्युसेक्सने पाणी जमा होत आहे. दुपारनंतर ही आवक 2 लाख क्युसेक्सपर्यंत वाढणार आहे. या पद्धतीच्या पाण्याच्या आवकेमुळे आज रात्रीपर्यंत धारण 25 टक्के जिवंत साठ्यात पोहोचणार असल्याने पुढील चार ते पाच दिवसात धरण 100 टक्क्यांची पातळी गाठू शकणार आहे.

गेल्या वर्षीच्या भीषण पाणी टंचाईमुळे उजनी धरण इतिहासातील सर्वात नीचांकी म्हणजे वजा 60 टक्के इतक्या निचांकी पातळीला पोहोचले होते. मात्र जून सुरु होताच पावसाने साथ दिल्याने धरणात हळू हळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसतातील पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता धरणाने शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे.

उद्या सकाळपर्यंत उजनी धरण 25 टक्के पातळी ओलांडणार

सध्या पुणे, लोणावळा, भीमाशंकर या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुळा, मुठा, इंद्रायणी या भीमा खोऱ्यातील नद्यांमधून मोठा विसर्ग उजनीकडे येत आहे. लोणावळा परिसरातील पावसामुळे सध्या खडकवासला 14 हजार, मुळशी 11 हजार, चासकमान 6 हजार, कासारसाई 1600, पवना 2 हजार तर भीमाशंकर परिसरातील पावसामुळे वाडीवाले धरणातून 2200 क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. थोड्या थोड्या वेळाने पावसाची परिस्थिती पाहून हे आकडे सातत्याने कमी जास्त होत आहेत.

काल सोडलेल्या पाण्यामुळे आज दुपारनंतर उजनी धरणात तब्बल 2 लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी जमा होणार आहे. पाण्याची तुफानी आवक पाहता उद्या सकाळी उजनी धरण 25 टक्के पातळी ओलांडणार असून असाच पाऊस सुरु राहिला तर पुढील चार दिवसात धारण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous Post

माडग्याळ येथे मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा अमोल डफळे सरकार यांचेहस्ते शुभारंभ ; शुभारंभानिमित्त बँकेकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा, पर्यटन विकासाचे महत्त्व आणि इतिहास समजण्यासाठी मानवी जीवनाचा बदल समजून घेण्याची गरज : इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. जावेद तांबोळी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group