news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ठाकरे गटाला मोठा धक्का ! धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
July 25, 2024
in राजकीय
0
ठाकरे गटाला मोठा धक्का ! धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मतमोजणी केंद्रात अंगरक्षकासह प्रवेश केल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे व कैलास पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या माध्यमातुन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले होते.

त्यात मतमोजणी केंद्रात आमदार कैलास पाटील व उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर हे नियमाला डावलून अंगरक्षकासह वावरताना दिसून आले. त्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

निसर्गाची अवकृपा ! विद्येच्या माहेरघरात मुसळधार पाऊस, पुण्यात पावसाचे चार बळी ; भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू तर अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तीन तरुणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Next Post

माडग्याळ येथे मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा अमोल डफळे सरकार यांचेहस्ते शुभारंभ ; शुभारंभानिमित्त बँकेकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group