news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

निसर्गाची अवकृपा ! विद्येच्या माहेरघरात मुसळधार पाऊस, पुण्यात पावसाचे चार बळी ; भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू तर अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तीन तरुणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

टीम लोकमन by टीम लोकमन
July 25, 2024
in ताज्या घडामोडी
0
निसर्गाची अवकृपा ! विद्येच्या माहेरघरात मुसळधार पाऊस, पुण्यात पावसाचे चार बळी ; भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू तर अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तीन तरुणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पुणे : अमोल रत्नपारखी

पुण्यात रात्रभर पडणारा मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून सुरू झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात अतिशय भयानक अशी पूरस्थिती उद्भवली आहे. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण असून महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्यामध्ये कामानिमित्त गेलेले लोक रस्ते जाम झाल्यामुळे पुण्यातच अडकून पडले आहेत.

पुणे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले आहे. पुण्याच्या निंबजनगर, एकता नगर भागात जवळपास 4 ते साडेचार फूट पाणी साचले असून त्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यासाठी चक्क रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर मुसळधार पावसात दुर्दैवाने चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुण्याला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असून विजेचा धक्का लागल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळ सदर घटना घडली आहे.

अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेक्कन भागात तीन जणांचा हातगाडी हलविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ज्या हातगडीवर व्यवसाय करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यात वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

तर ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे असे मुळशी तहसीलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, मुळशी तहसीलमधील ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम करत असून, ते हटवल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी

खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली हे तालुके आणि पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसरातील ‘घाट’ (डोंगरातील खिंडी) विभागातील अतिवृष्टीचा विचार करून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जेथे पूर आणि पूर येण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. विनाकरण घराबाहेर पडू नका असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

डॉ. रवींद्र आरळी यांचेकडून जत भाजप मधील गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न ; रवींद्र सावंत, अविनाश गडीकर यांचा आरोप, पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार

Next Post

ठाकरे गटाला मोठा धक्का ! धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group