news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात आज विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हाध्यक्ष सुरेश पवार

टीम लोकमन by टीम लोकमन
July 22, 2024
in सामाजिक
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात आज विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हाध्यक्ष सुरेश पवार

टीम लोकमन सोलापूर |

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 62 वा वर्धापनदिन आज राज्यभरात सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाखांच्यावतीने अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना 22 जुलै 1962 रोजी झाली. छात्र शिक्षकांना विद्यावेतन वाढवून मिळाले पाहिजे या मागणीसाठी 1960 च्या दशकांत छात्र शिक्षकांनी तीव्र लढा उभारला आणि तो यशस्वी झाला. तत्कालीन युवा शिक्षकांनी एकत्र येऊन पुढे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली.

महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ञ बॅ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पहिले अधिवेशन झाले. यामध्ये पहिले अध्यक्ष म्हणून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांची अध्यक्षपदी तर भा.वा. शिंपी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. या संघटनेची स्थापना, बांधणी आणि कार्यविस्तार यामध्ये सोलापूर जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे राज्याचे पहिले सरचिटणीस म्हणून वि. भा. येवले यांची एकमताने निवड करण्यात आली होती.

स्व. वि.भा. येवले यांनी सोलापूर जिल्ह्यात लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळत आहे. पूर्वी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदाची निवड संपूर्ण जिल्ह्यातील सभासद करीत असत अशा काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी येवले गुरुजी यांना दोनवेळा बहुमताने निवडून देत शिक्षक समितीच्या नेतृत्वावर विश्वास टाकला होता.

आज सोलापूर शहरातील मुरारजी पेठेत अतिशय देखणी आणि भव्यदिव्य उभी असलेली इमारत त्यांच्याच काळात साकारली आहे. जिल्ह्यातील नविन व जुन्या पिढीतील हजारो कार्यकर्त्यांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने ही संघटना बांधली आहे. ही संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार केल्याचे सरचिटणीस शरद रुपनवर यांनी सांगितले.

आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिवसभरात जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपन, शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेषतः यंदाच्या नविन शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील शाळांतून इयत्ता पहिलीत 30,255 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. शिवाय अनेक शाळांना दीर्घ प्रतिक्षेनंतर शिक्षक देखील प्राप्त झाले आहेत. म्हणून विशेषतः इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दुरेघी वही, उजळणी, पेन्शिल, खोडरबर अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून परिश्रम घेत आहेत. असेही सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले.

Previous Post

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ ; डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. डॉ. सुरेश साबू व असिस्टंट गव्हर्नर पूनम देवदास यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

कृष्णा, कोयना आणि वारणेच्या पुराचे पाणी दुष्काळी जत तालुक्यासाठी द्यावे ; अमोल डफळे यांची जलसंपदा विभागाकडे मागणी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group