टीम लोकमन मंगळवेढा |
देशात मिलेट इयर साजरी करण्यात येत असून महाराष्ट्रातून या प्रक्रिया उद्योगासाठी भरीव प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याबाबत आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मॅजिकल बाईटच्या सर्वेसर्वा डॉ प्रियदर्शनी महाडिक यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी उपस्थित होते. याप्रसंगी माहेश्वरी आर्ट गॅलरी तर्फे पांडुरंगाची पेंटिंग त्यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या समवेत मॅजिकल बाईट फूड प्रोसेसिंग मधील ज्वारीपासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनाबाबत सखोल चर्चा झाली व त्यांना कंपनीच्या वतीने बनवण्यात आलेल्या उत्पादनाच्या गुणधर्मामुळे होणारे फायदे व आहारातील उपयोगा बद्दल माहिती दिली असता त्यांनी यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
मॅजिकल बाईट फूड प्रोसेसिंग संस्थेकडून ज्वारीपासून निर्माण होणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना सोलापूर शहरप्रमुख अमोल शिंदे, उद्योजक पवन महाडिक आदी उपस्थित होते.









