news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राज्यात मोठी घडामोड ! खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या, ज्येष्ठ नेते शरद पवारांची घेतली भेट? राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

टीम लोकमन by टीम लोकमन
July 16, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
राज्यात मोठी घडामोड ! खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या, ज्येष्ठ नेते शरद पवारांची घेतली भेट? राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

टीम लोकमन मंगळवेढा |

अजित पवार गटातील महत्वाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सोमवारी अचानक सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शरद पवार आज पुण्यात आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदीबागेत असतानाच सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.

आज शरद पवार, सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. तब्बल तासभर सुनेत्रा पवार तिथे थांबल्या होत्या. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता कायम आहे. जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का? याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

शरद पवार ॲक्शन मोडमध्ये ?

विधान परिषद निवडणुकनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवार महाराष्ट्र राज्याच्या सहा दिवस दौऱ्यावर असणार आहेत. सोमवारीच शरद पवार पुण्याला रवाना झाले. बुधवारी शरद पवार यांचा पुण्यातील बालगंधर्व येथे कार्यक्रम होणार आहे.

भुजबळांनी शरद पवारांची भेट का घेतली?

भुजबळ आणि पवारांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषेद घेत ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले होते. “महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहे ते मराठा समाजाचे हॉटेल असेल तर तिथे जात नाहीत. काही लोक ओबीसी समाजाचे दुकान असेल तिथे मराठा समाज जात नाही. राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची एक जबाबदारी आहे. ही शांतता राखली पाहिजे,’ असे भुजबळांनी म्हटले.

भुजबळ पुढे म्हणतात, ‘पवारांचे असे म्हणणे होते की जरांगेंना मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली. आश्वासने दिली हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही हाकेंचे उपोषण सोडायला गेलात तेव्हा त्यांना काय सांगितले याचीही आम्हाला कल्पना नाही. जरांगेंना मंत्री भेटले ते काही माहिती नाही, यावर मी त्यांना म्हटलं की ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. तुम्ही आज राज्यातले ज्येष्ठ नेते आहात. सर्व सामाज घटकांची जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे तुम्ही या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे,’ असेही भुजबळांनी म्हटले आहे.

Previous Post

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; संचालक प्रकाश जमदाडे यांची उपस्थिती

Next Post

डॉक्टरांनाही लागले विधानसभेचे वेध ! भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा मोठ्या ताकदीने लढविणार आणि जिंकणारही : डॉ. सार्थक हिट्टी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group