news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत? ; राज्याच्या राजकारणात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
July 14, 2024
in राजकीय
0
अजितदादा ॲक्शन मोडवर ! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय ; पुणे महानगरपालिकेचा ‘तो’ अधिकार काढला, पुणे पोलिसांवर सोपवली मोठी जबाबदारी

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी समोर येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजितदादांऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे.

शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

अजितदादा पवार काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केले होते. अजित पवार यांचे हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या भाषणातील अजित पवारांचे वक्तव्य पाहता अजितदादा आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचीच चर्चा होत आहे. 16 फेब्रुवारी रोजीचे अजित पवार यांचे हे भाषण आहे. लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही. तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन. नाती तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असे अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचे हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे होते. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात आहे.

दादांच्या समर्थकांचे काय आहे म्हणणे?

बारामतीत राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे कार्यकर्ते म्हणतात, अजितदादा पवार बारामतीतून लढणार नाहीत, ही केवळ चर्चा आहे. यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. बारामती म्हणजे अजित पवार अशी ओळख आहे. त्यामुळे अजितदादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊ नये असेही अजित पवार यांच्या समर्थकांना वाटते.

Previous Post

पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या विशेष सुविधांवर वारकरी समाधानी ; पालखी सोहळा प्रमुखांसह रूपाली चाकणकरांनीही केले कौतुक

Next Post

भीषण अपघात ! सिटी बसने चौघांना चिरडले, संतप्त जमावाने फोडली बस ; पोलिसात गुन्हा दाखल, चौघेही एकाच कुटुंबातील, 9 वर्षांचा चिमुकला जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी, बस सोडून ड्रायव्हर फरार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group