news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

……तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, माझा मतदारसंघ महायुतीला ; आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा, बच्चुभाऊ राजकारणातून निवृत्ती घेणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
July 14, 2024
in राजकीय
0
……तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, माझा मतदारसंघ महायुतीला ; आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा, बच्चुभाऊ राजकारणातून निवृत्ती घेणार?

टीम लोकमन मंगळवेढा |

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत, त्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशाराच त्यांनी दिला होता.

त्यानंतर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे. ’19 तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल, माझी सीट मी महायुतीला देणार’ असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले आहेत बच्चू कडू?

’19 तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल, माझी सीट मी महायुतीला देणार. जर मागण्या मान्य झाल्या तर मग निवडणूक कशासाठी लढवायची’ असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की ‘मी महायुतीमध्ये नाहीये, तुम्हाला कोण म्हटले मी महायुतीमध्ये आहे. आम्ही 19 तारखेला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत, मागण्या मान्य झाल्या तर मी निवडणूक लढवणार नाही. आमची तिसरी आघाडी नसेल तर आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी करू, ती पहिली आघाडी असेल बाकी सगळ्या आघाड्या त्यानंतर येतील असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

काय आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या?

आम्ही सरकारला एकूण 18 मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ज्यामध्ये पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमीमधून करावीत, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावेत, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी अशा आमच्या मागण्या असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Previous Post

जत तालुक्यातील खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेचा खून करून प्रसार झालेला आरोपी अखेर जेरबंद ; उमदी पोलिसांची कारवाई, आर्थिक व्यवहारातून झाला खून

Next Post

पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या विशेष सुविधांवर वारकरी समाधानी ; पालखी सोहळा प्रमुखांसह रूपाली चाकणकरांनीही केले कौतुक

Next Post
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज ! आषाढी वारीतील वारकऱ्यांना पिण्यासाठी 299 टँकरने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे

पालखी सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या विशेष सुविधांवर वारकरी समाधानी ; पालखी सोहळा प्रमुखांसह रूपाली चाकणकरांनीही केले कौतुक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group