news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढ्याची उपसा सिंचन योजना व मंगळवेढा उपजिल्हा रुग्णालयास निधीची अर्थसंकल्पात तरतूद ; लवकरच कामाचा शुभारंभ करणार : आमदार समाधान आवताडे

टीम लोकमन by टीम लोकमन
July 11, 2024
in ताज्या घडामोडी
0
भर पावसात आमदार समाधान आवताडे मंगळवेढ्याच्या आठवडा बाजारात ; व्यापारी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मंगळवेढा उपसा योजनेला व मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या कामाला अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणीत निधीची तरतूद झाली असून या योजनेचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे, हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशा टीका विरोधकांनी केल्या मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये या योजनेसाठी निधीची तरतूद झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात या योजनेचे काम सुरू होणार असल्याने वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला आहे.

पोटनिवडणुकीत पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या. महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो. असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत दिला होता. त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत १३ मार्च २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६९७.५१ कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विनाअट मंजुरी दिली.

मंगळवेढेकरांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण केल्याने मंगळवेढा तालुक्यातून फटाके फोडून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांकडून या अगोदरही अशी मंजुरी मिळाली होती यात नवीन काय? असे म्हणत या मंजुरीची खिल्ली उडवली जात होती. मात्र दुसऱ्याच दिवशी या कामाचे पहिल्या टप्प्यातील 111 कोटीची निविदा पब्लिश करण्यात आली होती.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये या योजनेच्या निधीसाठी तरतूद करण्यात आली असून दोन्हीही कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक व पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची : शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम

Next Post

इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज म्हणजे अनेक पिढ्यांना ज्ञान देणारी मंगळवेढा तालुक्यातील नामवंत संस्था : डॉ. नंदकुमार शिंदे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group