news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आमचं ठरलंय ! वीस हजार जणांच्या उपस्थितीत अजितदादांचे 40 नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार? ‘या’ तारखेला होणार प्रवेश

टीम लोकमन by टीम लोकमन
July 10, 2024
in राजकीय
0
राष्ट्रवादी पुन्हा ! भारतीय जनता पार्टीला राज्यात पुन्हा मोठा धक्का ; या माजी केंद्रीय मंत्र्याचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश?

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते आपल्यासाठी सोयीची राजकीय वाट निवडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक समर्थक लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कामगिरीमुळे शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यांचा स्ट्राइक रेट 80 टक्के राहिला आहे. यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन अनेक नेतेमंडळी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. रोज किमान दोन तास शरद पवार यांना पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठीसाठी काढावे लागत असल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड मधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झाले होते. पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.

याच पिंपरी चिंचवड मधून अजितदादांसोबत असलेले 40 नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी 20 जुलै हि तारीख निश्चित करण्यात आली आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. 20 जुलैच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पण 20 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्याकडे जाणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

धक्कादायक ! ‘ती’ मागणी करत पोलीस असलेल्या पतीकडून जागृतीचा छळ ; नवविवाहितेने संपवले जीवन, वडिलांना केला ‘हा’ शेवटचा मेसेज

Next Post

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दामाजी महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाचा प्रारंभ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group