news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भीषण अपघात ! विजापूर गुहागर महामार्गावर जत जवळ बोलेरो गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 10, 2024
in क्राईम
0
भीषण अपघात ! विजापूर गुहागर महामार्गावर जत जवळ बोलेरो गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

जत : पांडुरंग कोळळी

जत विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ बोलोरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

राजेंद्र आनंदराय बिराजदार वय 35 रा. उटगी व दर्याप्पा संगप्पा बिराजदार उर्फ (कुमार संख) वय 34 रा. जाडर बोबलाद असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर संजय हनुमंत कोळगिरी रा. उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बुलेरो गाडी क्रमांक (एम. एच. 04/2121) मधून निघाले होते. जत नागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगात जात असताना गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना 12:30 च्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांने जत पोलिसांना या अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील मयत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे. तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडर बोबलाद गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

शिवसेना उपशहरप्रमुख नागनाथ महादापुरे व विजय खामणकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

धक्कादायक ! ‘ती’ मागणी करत पोलीस असलेल्या पतीकडून जागृतीचा छळ ; नवविवाहितेने संपवले जीवन, वडिलांना केला ‘हा’ शेवटचा मेसेज

Next Post
धक्कादायक ! ‘ती’ मागणी करत पोलीस असलेल्या पतीकडून जागृतीचा छळ ; नवविवाहितेने संपवले जीवन, वडिलांना केला ‘हा’ शेवटचा मेसेज

धक्कादायक ! 'ती' मागणी करत पोलीस असलेल्या पतीकडून जागृतीचा छळ ; नवविवाहितेने संपवले जीवन, वडिलांना केला 'हा' शेवटचा मेसेज

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group