news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात ; दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी तर 18 ते 20 प्रवासीही जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

टीम लोकमन by टीम लोकमन
July 7, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात ; दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी तर 18 ते 20 प्रवासीही जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

टीम लोकमन मंगळवेढा |

अलिबाग रेवदंडा मार्गावर बेलवडे फाटा येथील वळणावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून 18 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी असून एकाचा पाय तुटला आहे तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात स्थळी पोलीस प्रशासन एसटी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना मदत केली.

महाजने रेवदंडा ही राज्य परिवहन महामंडळाची बस रेवदंडाकडे जात होती. तर मुरुड बार्शी ही राज्य परिवहन महामंडळाची बस अलिबागच्या दिशेने येत होती. अक्षय येथील वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दोन्ही बसनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात महाजने रेवदंडा या बसच्या चालकाच्या पायाला व मुरुड बार्शी बसचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बसमधील 18 ते 20 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

Previous Post

भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, पंढरपूर मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग ; भगीरथदादा तुतारी हातात घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरणार?

Next Post

भाजपला मोठा धक्का ! छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार ; सहा नगरसेवकांसह ‘या’ मोठ्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

Next Post
भाजपला मोठा धक्का ! छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार ; सहा नगरसेवकांसह ‘या’ मोठ्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

भाजपला मोठा धक्का ! छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार ; सहा नगरसेवकांसह 'या' मोठ्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group