टीम लोकमन मंगळवेढा |
राज्य शासनाच्या सरळ सेवा परीक्षेतून मंगळवेढ्याच्या नर्मदा पार्क येथील अनुजा अशोक मलगोंडे यांची औरंगाबाद विभागामध्ये पुरवठा निरीक्षक पदावर निवड झाली आहे. अनुजा सध्या मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे तलाठी पदावर कार्यरत आहेत.
अनुजा मलगोंडे या मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडी येथे तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मंगळवेढा येथे झाले. त्यानंतर त्यांनी वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयातून बीएससी ॲग्री ही पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यापूर्वीही त्यांचे सरळ सेवेतून विविध पदांवर निवड झाली होती.
त्यांच्या निवडीबद्दल आमदार समाधान आवताडे, आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील माजी चेअरमन शशिकांत बुगडे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रेवणसिद्ध लिगाडे व अशोक केदार, डोणजच्या सरपंच कीर्ती केदार, मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संजय चेळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मलगोंडे, संत चोखामेळानगर ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच अनिता कदम, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शंभूदेव कदम, संत दामाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार पवार, इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. जावेद तांबोळी, सेवानिवृत्त उपप्राचार्य सदाशिव कोकरे, आदर्श शिक्षक समितीचे नेते मल्लिकार्जुन माळी, पाठखळचे माजी सरपंच सिद्धेश्वर मेटकरी, उद्योजक दिलीप घाडगे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, भूविकास बँकेचे माजी अधिकारी भीमराव डांगे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक मलगोंडे, शिक्षक नेते राजेंद्र कोरे, तळसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, उद्योजक संतोष बुरकुल, रावसाहेब चव्हाण, प्रा. लक्ष्मण जरे, जयश्री हत्ताळे यांच्यासह नर्मदा पार्क परिवारातील सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











