news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी सीए सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी ब्रिजकुमार गोयदानी ; शनिवारी पदग्रहण समारंभ, माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
July 5, 2024
in सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी सीए सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी ब्रिजकुमार गोयदानी ; शनिवारी पदग्रहण समारंभ, माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांची उपस्थिती

टीम लोकमन सोलापूर |

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष 2024-25 सालाकरीता अध्यक्षपदी रोटे. सीए सुनिल माहेश्वरी तर सचिवपदी रोटे. ब्रिजकुमार गोयदानी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती क्लबच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी दिली. पदग्रहण समारंभ शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता गुजरात भवन सोलापूर येथे होणार असून या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी जिल्हा 3131 चे माजी प्रांतपाल डॉ. अनिल परमार (न्यु पनवेल) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या सहाय्यक प्रांतपाल रोटे. सौ. पुनम देवदास यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

ह्यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग, आरोग्य तपासणी शिबीर, वरीष्ठ नागरीकांकरीता साक्षरता अभियान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, किचन गार्डनींग, वृक्षारोपणासह, रक्तदान शिबीर, नुकतेच आंतरराष्टीय रोटरीद्वारे प्राप्त ५०७१० डॉलर्सचा निधीद्वारे रोटरी रेडक्रॉस द्वारे थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांकरीता जनजागृती, सल्ला व समुपदेशन, आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस असल्याचे नुतन अध्यक्ष रोटे. सीए सुनिल माहेश्वरी यांनी सांगितले. शिवाय रोटरी फौंडेशन ग्लोबल ग्रांटद्वारे यावर्षी कॅन्सर स्क्रिनिंग आणि जागृतीसाठी मोबाईल वाहन आणण्याचा आणि किडनी रोग्यांसाठी डायलेसिस सेंटर उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब सोलापूरद्वारा अन्नपूर्णा योजने अंतर्गत गेली १७ वर्षांपासून १०० वयोवृध्द गरजूंना दररोज एक वेळचे जेवण दिले जाते. तसेच कायमस्वरुपी रेडक्रॉस रोटरी केंद्रद्वारे अत्यंत अल्पदरात जयपूर फूट बसविले जातात. याशिवाय सायकल बँक प्रकल्पाअंतर्गत गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात येत आहे. या सायकली मुलींंचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडेच राहतात व नंतर इतर गरजूंना देण्यात येतात. रोटरी नाना नानी पार्क, रोटरी पॉल हॅरिस स्मृती वन, रोटरी काव्यश्रृष्ठी आदी कायमस्वरुपी प्रकल्प रोटरी क्लब सोलापूर द्वारे राबविले जात आहेत.

नुतन अध्यक्ष रोटे. सीए सुनिल माहेश्वरी हे ऑटोमोबाईल आणि सिमेंट व्यवसाईक आहेत. ते डी एच बी सोनी कॉलेज, एम सर्कल आदी संस्थांवर कार्यरत आहेत. सचिव ब्रिजकुमार गोयदानी हे टेक्सटाईल उत्पादक असून माहेश्वरी विकास मंडळ सोलापूरचे सक्रिय सदस्य आहेत.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे 2024-25 चे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट 2025-26 सौ. धनश्री केळकर, सहसचिव निलेश फोफलिया, खजिनदार मितेश पंचमिया, आयपीपी डॉ. ज्योती चिडगुपकर, क्लब लर्निंग फॅसिलीटेटर बी. एस. मुंदडा, सार्जंट ऍट आर्म्स सीए राजगोपाल मिणीयार, संचालक सर्वश्री कौशिक शाह, शिवाजी उपरे, सौ. विद्या मणुरे, सौ. पारुल पटेल, गोवर्धन चाटला, विशाल वर्मा, आनंद गुंड्याल, सुरज तापडिया, सलाम शेख, डॉ. प्रत्युश कावरा व संपादक श्रीकृष्ण गलगली व संदीप जव्हेरी.

या पत्रकार परिषदेस रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2026-27 चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. जयेश पटेल, रोटे. डॉ. ज्योती चिडगुपकर, रोटे. विद्या मणुरे, रोटे. धनश्री केळकर, रोटे. निलेश फोफलिया, रोटे. संदीप जव्हेरी, रोटे. सलाम शेख आदी उपस्थित होते.

Previous Post

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचेवर शासनाने सोपवली ‘हि’ महत्त्वपूर्ण जबाबदारी

Next Post

अतिसार थांबवा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group