news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मंगळवेढा येथे विविध कायदेविषयक शिबिर संपन्न ; दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
July 4, 2024
in सामाजिक
0
इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मंगळवेढा येथे विविध कायदेविषयक शिबिर संपन्न ; दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वार्षीक दिनदर्शिकेप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एम. एस. आझमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यु.पी. देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा तसेच विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लीश स्कुल व ज्युनीअर कॉलेज मंगळवेढा येथे गुरुवार दिनांक ४ जुलै रोजी श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांचे अध्यक्षतेखाली विविध विषयांवर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्रीमती. व्ही. के. पाटील सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांनी सायबर गुन्हा (Cyber Crime) याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने यांनी कॉपी ॲक्ट, व मोटर वाहन अधिनियम (M.V.Act) या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराचे महत्व विद्यार्थ्यांना प्रास्ताविकामध्ये सांगितले. ॲड. श्रीमती. एस. आर. क्षीरसागर यांनी लैंगीक गुन्हयांपासुन बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) बाबत मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती. आर. जी. माने-चाैधरी यांनी बाल न्याय कायदा (Juvenile Justice Act) बाबत मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती. ए. ए. भिंगे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयी मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती. टि.सी. मुजावर यांनी शिक्षणाचा अधिकार (Right To Education) याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच इंग्लिश स्कुल व ज्युनीअर कॉलेज मंगळवेढाच्या संचालीका डॉ. मीनाताई कदम यांनीही यावेळी मनोगत व्यक्‍त केले. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, ॲड. पी. जी. घुले, ॲड. एस. आर. पवार, ॲड. एफ. आर. मुल्ला, ॲड. डी. एस. माने, ॲड. अश्वीनीत चेळेकर, ॲड. ओ. आर. भुसे, ॲड. सौरभ मोरे, ॲड. एस. ए. सावंत, ॲड. श्रीमती. हसीना सुतार, ॲड. श्रीमती रेखा गोवे, ॲड. श्रीमती सीमा ढावरे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

तसेच इंग्लिश स्कुल व ज्युनीअर कॉलेजच्या संचालीका डॉ. मीनाताई कदम, प्राचार्य रविंद्र काशिद, उपप्राचार्या तेजस्वीनी कदम, सचिन इंगळे सर, दिपक शिणगारे सर, रेवणसिध्द लिगाडे सर व इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. एस. बी. ताड यांनी केले व श्रीमती. एस. ए. जगताप यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येेने विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी उपस्थित राहुन कायदेविषयक शिबीराचा लाभ घेतला. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Previous Post

मोठी बातमी ! विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन अखेर मागे ; शिवीगाळ प्रकरणात झाली होती निलंबनाची कारवाई

Next Post

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 47 हजार 80 शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये पिकविमा मंजूर : आमदार समाधान आवताडे

Next Post
भर पावसात आमदार समाधान आवताडे मंगळवेढ्याच्या आठवडा बाजारात ; व्यापारी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 47 हजार 80 शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये पिकविमा मंजूर : आमदार समाधान आवताडे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group