news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव ; शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही : तमनगौडा रवीपाटील

टीम लोकमन by टीम लोकमन
July 2, 2024
in सामाजिक
0
जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव ; शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही : तमनगौडा रवीपाटील

जत : पांडुरंग कोळळी

जत कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपच्यावतीने कृषी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भाजपच्या वतीने विराट मोर्चा व घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवीपाटील उमदी येथील शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे, सरकार पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत गडदे, नगरसेवक टीमू एडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा बसवेश्वर चौकपासून कृषी अधिकारी कार्यालयावर पोहचला.

तालुका कृषी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना तमनगौडा रवीपाटील म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका व मंडळ स्तरावर कृषी कार्यालयांची स्थापना केली आहे‌‌. मात्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यावर्षी चांगला पाऊस पडूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळू शकत नाहीत. अनेक शासकीय योजना फळबाग लागवडीचे अनुदाने व प्रस्ताव व्यवस्थित केले जात नाहीत. शेतकऱ्यांना कार्यालयाकडे हेलपाटे घालावे लागतात. सर्व मंडल कार्यालयाचा कारभार हा जत मध्ये बसून केला जातो. ही मंडल कार्यालये नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावीत. तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचून सेवा देण्यात यावी. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यावर होणारा अन्याय यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.

यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विविध मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांना देण्यात आले. निवेदनात जत तालुक्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने तालुक्याबाहेर बदल्या करण्यात याव्यात. मंडल कृषी कार्यालयांचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावा. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी नेमून दिलेल्या गावांना नियमित गावभेटी कराव्यात. भाऊसाहेब फुंडकर योजनेतील फळबाग लाभार्थींना तातडीने निधी देण्यात यावा. रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. खते व बियाणांचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गाववार करण्यात यावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतच्या फलकावर लावण्यात यावी.
या मागण्यांचा समावेश होता.

सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे. अशी ठाम भूमिका कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावर कृषी अधिकाऱ्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नागेश सोनूर, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, जाडरबोबलादचे सरपंच रामलिंग निवर्गी, नवाळवाडीचे सरपंच अमोल शेटे, नवाळवाडीचे उपसरपंच लहू सूर्यवंशी, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामन्ना बंडगर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सदस्य कुमार जैन, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य चिदानंद संती, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य अतुल गुजले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य प्रदीप जाधव, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पिरगोंडा कोळी, भाजपा विद्यार्थी आघाडी जत तालुकाध्यक्ष विशाल महारनूर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली, युवक नेते विठ्ठल मसळी, युवक नेते संजय नेमाणे, युवक नेते नरेंद्र कोळी, युवक नेते संजय सवदे, युवक नेते शरद हिप्परकर, युवक नेते सचिन निकम, सुरेश पाटील उपस्थित होते.

Previous Post

मोठी कारवाई ! विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेवर शिवीगाळ प्रकरणी कारवाई ; सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबन

Next Post

आता दातांवरही होणार मोफत उपचार ! दंत वैद्यकीय उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ? राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group