news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

उमदी पोलीस ॲक्शन मोडवर ! सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांचे करजगी येथील जुगार व दारू अड्ड्यांवर छापे, पाच आरोपींना अटक ; नवे सिंघम अवैध धंद्यांना चाप लावणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
July 1, 2024
in क्राईम
0
लोकसभा निवडणुकीत मंगळवेढा पोलिसांची दमदार कामगिरी ; पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या योग्य नियोजन आणि कार्यतत्परतेमुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत

जत : पांडुरंग कोळळी

उमदी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी करजगी ता. जत येथे जुगार अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्या ठिकाणचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौलाली करीमसो मुजावर वय 43 रा. कागनरी, रवी शंकर कांबळे वय 39 रा. करजगी, संजय आप्पासाहेब कांबळे वय 30 रा. करजगी, सुभाष कुंडलिक शिवशरण वय 35 कगनारी, अप्पासाब अमीन जातगार रा. करजगी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तसेच कुलाळवाडी येथे विना परवाना दारु अड्डयावर छापा टाकून महादेव करू पडुलकर वय 65 रा. कुलाळवाडी या आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वीच उमदी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांनी उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा वळवल्याने उमदी परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कर्नाटक सीमेलगत हा परिसर येत असल्याने अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नव्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी अवैध धंद्यावर कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्यांमधून त्यांचे कौतुक होत असून कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

जिल्हा मुख्यालयापासून शेकडो किलोमीटर दूर हा परिसर असून कर्नाटक सीमेलगत आहे. बहुतांश कन्नड भाषिक लोक या परिसरात राहतात. या परिसरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर नियंत्रण आणून गुन्हेगारी संपुष्टात आणणे, अवैध व्यवसायांना चाप लावण्याचे मोठे आव्हान नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासमोर आहे. त्यांनी त्यांची या पोलीस ठाण्यातील कारकिर्दीची सुरुवात तर सिंघम स्टाईलने केली असून ते अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरतात का? हे पाहणे औतुक्षाचे ठरेल.

Previous Post

आता CBSE बोर्डाची परीक्षा होणार वर्षातून दोनदा ; केंद्र सरकारकडून मिळाली मंजुरी, जाणून घ्या काय असेल पॅटर्न

Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

Next Post
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group