माडग्याळ : नेताजी खरात
जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांचा सत्कार माडग्याळ येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. सार्थक हिट्टी यांनी सत्कार केला.
यावेळी त्यांचेसमवेत लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटीचे अध्यक्ष व न्यूज 87 लोकमन चे पत्रकार नेताजी खरात, स्वराज्य माझा न्युजचे संपादक पांडुरंग कोळ्ळी, उटगी येथील डॉ. सचिन बासरगाव, गुड्डापूरचे युवा नेते अजित नाईक उपस्थित होते.
यावेळी संदीप कांबळे यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले व त्यांनी डॉ. सार्थक हिट्टी यांना कायद्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कायद्याचे पालन करणाऱ्यांच्या आम्ही नेहमी पाठीशी असतो. अन्यायाविरुद्धच्या कार्यास आम्ही नेहमी आपणास सहकार्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले.









