news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमने गळफास घेत संपवले आयुष्य ; कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरजच्या आत्महत्येने कुस्ती विश्वासह सांगली जिल्ह्यावर शोककळा

टीम लोकमन by टीम लोकमन
June 28, 2024
in क्राईम
0
कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमने गळफास घेत संपवले आयुष्य ; कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरजच्या आत्महत्येने कुस्ती विश्वासह सांगली जिल्ह्यावर शोककळा

टीम लोकमन मंगळवेढा |

सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावचा रहिवासी आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पैलवान सुरजने आत्महत्या का केली याबाबत पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यावर शोककळा

पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे.

कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या आधी सूरजच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यामुळे तो व्यथित झाला होता. सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

Previous Post

खळबळजनक ! धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तरुणीची हत्या ; आनंदवनातच घडलेल्या प्रकाराने खळबळ, पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला ठोकल्या बेड्या

Next Post

सलून चालकाच्या मुलाला केंद्र सरकारकडून २५ लाखाची फेलोशिप ; मिझोराममध्ये भौतिकशास्त्रात पीएचडी करणार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group