टीम लोकमन मंगळवेढा |
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि सहाय्यक पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले श्रीधर देशपांडे यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी अटक केली आहे.
यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर येथे मौजे नालेगाव या ठिकाणी 2260.22 चौरस मीटर फ्लॅट ची खरेदी झाली होती. सदर फ्लॅटवर बांधकाम करावयाचे असल्याने परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जाला परवानगी देण्यासाठी महानगरपालिकेचे लिपीक आणि अतिरिक्त स्विय सहायक असलेले श्रीधर देशपांडे यांच्यामार्फत या महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी तक्रारदाराकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबतचा गुन्हा हा 19 व 20 जून रोजी दाखल करण्यात आला होता. त्याची पडताळणी झाल्यानंतर आज सदरची लाच स्वीकारताना श्रीधर देशपांडे आणि महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस कर्मचारी गजानन घायवट, शिवाजी जमदाडे, गणेश शेळके, गणेश भुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे, भालचंद्र बिनोरकर या जालन्याच्या पथकाने केली आहे.
या कारवाईनंतर अहमदनगर शहरात फटाके पासून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.









