नांदेड : उज्वला गुरसुडकर
तालुक्यातील माळाकोळी येथे आज दि.20 जुन रोजी दुपारी 1 वाजता नांदेड लातुर राष्ट्रिय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .गेल्या अनेक दिवसापासुन प्रा.लक्ष्मण हाके यांनी वाड गोंधळी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत यांना पाठीबा देण्यासाठी माळाकोळी येथे काहि काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी घोषणाबाजी देण्यात आली. ओबीसी आरक्षणाला सरकारने धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे. यापुढे महाराष्ट्र सरकारने प्रा.लक्ष्मण हाके यांच्या मागणीची दखल घेतली नाहि तर सकल ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ओबीसी नेते माऊली गीते यांनी दिला यावेळी रामेश्वर केंद्रे, कृष्णा’भाऊ केंद्रे,नामदेव कारेगावकर, कालीदास मूस्तापुरे, दता चाटे लक्ष्मण केंद्रे ,परमेश्वर मूरकुटे ,रमेश नागसाखरे , मलाकार्जून शिगणापुरे ओम खेडकर माळाकोळी सर्कल मधील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थीत होता.







