news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने पतीने केला खून ; देहू येथील घटनेने खळबळ, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

टीम लोकमन by टीम लोकमन
June 24, 2024
in क्राईम
0
धक्कादायक ! पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने पतीने केला खून ; देहू येथील घटनेने खळबळ, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

टीम लोकमन मंगळवेढा |

पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही म्हणून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात २० जून रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतीक्षा जयदीप यादव (वय-२१) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती जयदीप अर्जुन यादव (वय-२९, रा. देहूगाव, मूळ. रा. चिखलगोल, सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे एम. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले होते. डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेला जयदीप यादव आणि प्रतीक्षा हे दोन महिन्यापूर्वीच विवाहबंधनात अडकले होते. जयदिप हा खाजगी कंपनीत पुणे येथे नोकरीला आहे. तो ८ दिवसापूर्वीच पत्नी प्रतीक्षाला घेऊन देहूगाव येथे दोघे राहण्यासाठी आला होता.

पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीपला होता. त्यावरून त्याने गुरुवारी रात्री प्रतिक्षाला घेऊन देहूगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला गेला. त्याठिकाणी ओढणीने प्रतिक्षाचा गळा आवळून त्याने खून केला. संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी नातेवाईकांनी जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे हे करीत आहेत.

Previous Post

मंगळवेढा येथील लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण अवघडे यांची निवड

Next Post

गुरुजी तुम्हीसुद्धा ! 50 लाख रुपये द्या आणि पेपर घ्या, पेपर फुटीचा लातूर पॅटर्न ; नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल, एक शिक्षक पोलिसांच्या ताब्यात तर दुसरा झाला फरार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group