टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील रहिवासी व श्रीमती सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान महाविद्यालय पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे कार्यरत असलेले प्रा. सागर महादेव पाटील यांना नेपाळ येथील ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम या संस्थेने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे.
प्रा. सागर पाटील यांना यापूर्वी नांदेड येथील जीवन साधना फाउंडेशनचा शिक्षण व समाजसेवा, पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा शिक्षण व संशोधन पुरस्कार तसेच परभणी येथील आचार्य नरेंद्र देव शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकास आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
प्रा. सागर पाटील हे मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावचे रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारोळी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कूल सलगर बुद्रुक येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे झाले तर शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथून त्यांनी बीएड ही पदवी संपादन केली आहे. गेल्या दहा वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रा. पाटील हे शिक्षण क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत ते विविध संस्थांवर काम करत असून लिंगायत समाजाच्या बसव ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य करत आहेत. ते रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सदस्य असून ते डेव्हलपमेंट चेअरमन म्हणून कार्य करत आहेत.
पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आमदार समाधान आवताडे, युवक नेते भगीरथ भालके, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, श्रीमती सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय शिंदे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, सचिव मेजर चंगेजखान इनामदार, सागर शहा, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, डॉ. दशरथ फरकंडे, चेतन गाढवे, दिलीप घाडगे, डॉ. मनीष बसंतवाणी, जनार्धन शिवशरण, असिफ शेख, उमेश मर्दा, डॉ. दत्तात्रय घोडके, डॉ. समाधान टकले, समीर इनामदार, प्रा. श्रीगणेश गायकवाड, धनाजी जाधव, डॉ. निनाद नागणे, सुशील पाटील, दत्ता भुसे, भरतसिंह राजपुरोहित, डॉ. सचिन बनसोडे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र कोरे, संतोष जामगुंड सर, मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक मलगोंडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










