टीम लोकमन मंगळवेढा |
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्यावतीने एप्रिल-मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या तबला विशारद परीक्षेत मंगळवेढा येथील विश्वजीत गणेश यादव प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. विश्वजीतने तबला प्रारंभिक परीक्षेपासून विशारद परीक्षेत पर्यंतच्या एकूण सात परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

विश्वजीत यादव याने तबला शिक्षण चैतन्य संगीत विद्यालय मंगळवेढा येथे पूर्ण केले असून त्याला विद्यालयाचे प्रमुख तथा संगीत विशारद प्रसाद पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
मंगळवेढ्यातील जवाहरलाल हायस्कूल येथे विश्वजीतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले असून सन 2024 च्या दहावी परीक्षेत प्रशालेतील सर्वोत्तम गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोणत्याही सांगितिक पार्श्वभूमीशिवाय शाळेचा उत्तम अभ्यास करत त्याने बॉल बॅडमिंटन खेळामध्ये सुद्धा राज्यस्तरावर यश संपादन केले आहे. संगीत विशारदचा सात वर्षाचा महत्वपूर्ण टप्पा त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
विश्वजीत यादवच्या या यशाबद्दल चैतन्य संगीत विद्यालयाचे आधारस्तंभ शशिकांत पाटील, विद्यालयाचे संगीत अलंकार उदय भूमकर, संगीत अलंकार भारत सरवळे, जवाहरलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर आवताडे, संगीत विशारद डॉ. शोभा पाटील, सूरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, मंगळवेढा म्युझिक क्लबचे लहू ढगे, पतंजली परिवार, मंगळवेढा तालुक्यातील संगीतप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.










