टीम लोकमन मंगळवेढा |
फिर्यादी विजय जगन्नाथ यादव रा. मारापुर ता. मंगळवेढा यांना आरोपी बिरूदेव शिवाजी वगरे रा. तावशी ता. पंढरपूर जि. सोलापूर यांनी हात उसने घेतलेले पैसे परतफेड करण्याकरिता दिलेला धनादेश अनादर झाल्या प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाचे फौजदारी न्यायाधीश आर. एम. देवर्षी यांनी दोन महिने करावासाची शिक्षा सुनावली. तसेच नुकसान भरपाई म्हणून दोन लाख चार हजार पाचशे रुपये देण्याचा आदेश केला. नुकसान भरपाईची रक्कम न दिलेस आणखी एक महिना करावासाची शिक्षा सुनावली आहे.
याची हकीकत अशी की, बिरुदेव शिवाजी वगरे यांनी फिर्यादी विजय जगन्नाथ यादव यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. सदर रकमेच्या परतफेडीसाठी विजय यादव यांना धनादेश दिलेला होता. सदरचा धनादेश आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादर झाला. त्यानंतर फिर्यादीने मंगळवेढा येथील ॲड. जावेद डी. मुल्ला यांचेमार्फत मंगळवेढा न्यायालयात फिर्याद दाखल केली.
सदरच्या फिर्यादीची चौकशी होऊन आरोपी बिरूदेव शिवाजी वगरे यांना न्यायाधीश आर. एम. देवर्षी यांनी दोन महिने कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई म्हणून दोन लाख चार हजार पाचशे रुपये देण्याचा आदेश केला. व नुकसान भरपाई फिर्यादीस न दिल्यास आणखी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये फिर्यादीतर्फे ॲड. जावेद डी. मुल्ला यांनी कामकाज पाहिले.











