news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू ; ‘या’ केंद्रीय मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

टीम लोकमन by टीम लोकमन
June 6, 2024
in राजकीय
0
मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू ; ‘या’ केंद्रीय मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात वायूवेगाने घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपाच्या पराभवाची आणि खराब कामगिरीची जबाबदारी स्विकारली आहे. फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारीच दाखवली आहे. त्यापाठोपाठ आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी NDA मध्ये परत यावं यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याकडे उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

भाजपा आणि शिवसेना यांची महाराष्ट्रात 25 वर्षांपेक्षा अधिक काळ युती होती. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदारांचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपाच्या पाठिंब्यावर सध्या एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा मोठा पराभव झाला. भाजपाला केवळ 9 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानंही 9 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपाची देशभरातही मोठी पिछेहाट झाली. त्यांचे संख्याबळ 303 वरुन 240 वर घसरले. तर एनडीएला 292 जागा मिळाल्या.

या निवडणूक निकालानंतर भाजपानं नव्या मित्र पक्षांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंना परत एनडीएमध्ये आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झाले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याला याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.

Previous Post

मोठी बातमी ! अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात ; आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, राज्याच्या राजकारणात खळबळ

Next Post

मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बैठकीला पाच आमदारांची दांडी ; लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात मोठी अस्वस्थता

Next Post
मोठी बातमी ! अजितदादांशी संबंधित ‘या’ घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बैठकीला पाच आमदारांची दांडी ; लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात मोठी अस्वस्थता

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group