news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

चलो दिल्ली ! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे आक्रमक ; राष्ट्रपतींना भेटून करणार तक्रार

टीम लोकमन by टीम लोकमन
June 5, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
चलो दिल्ली ! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे आक्रमक ; राष्ट्रपतींना भेटून करणार तक्रार

टीम लोकमन मंगळवेढा |

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला. मात्र या पराभवाआधी मतमोजणी केंद्रात नाट्यमय थरार रंगला. त्या मतदारसंघात पेटलेली मशाल विझल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यासंदर्भात ते राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याकडे तक्रार करणार असून महामहिम राष्ट्रपतींच्या दरबारात नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा ठाकरे गटाला आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या. टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल किर्तीकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली होती. तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. मात्र पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्यावतीने आज राष्ट्रपती यांना पत्र लिहिण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहेत. राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजय असल्याची घोषणा मात्र रिकाऊंटिंगमध्ये पुन्हा रवींद्र वायकर विजयी असल्याचे घोषित केल्यानंतर ठाकरे गटाने ही भूमिका घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत दमदार यश मिळवले. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानवे लागले. राज्यात काँग्रेसला सर्वाधिका 13 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेंना 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सांगलीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. विशाल पाटील हे महाविकास आघाडी सोबत येणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगितल्याने महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या जागा 31 झाल्या आहेत.

Previous Post

कोल्हापुरात राजेच ! कोल्हापूरात मान आणि मत सुद्धा गादीलाच ; काँग्रेसच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची विजयाकडे वाटचाल…

Next Post

धक्कादायक निर्णय ! लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली ; देवेंद्र फडणवीस देणार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group