बोराळे : राजकुमार धनवे
नूतन हायस्कूल बोराळे येथील शैक्षणिक वर्ष 1998-99 च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहामध्ये पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा बोराळे गावांमध्ये एकत्र येऊन शनिवार दिनांक 25 मे रोजी शाळा भरवली.
बॅचमधील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक क्लार्क शिपाई यांच्याशी संपर्क साधून 74 विद्यार्थी 25 शिक्षक व सहा शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 105 व्यक्ती 25 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येण्याचा योग शाळेमध्ये आला सर्व विद्यार्थी एकसंघ दिसावेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकाच रंगाचे पोशाख परिधान केले होते.
रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेदहा वाजता दैनंदिन शाळेप्रमाणे प्रार्थनेच्या गजर बेलने झाली सन 1999 चे शिक्षक दिगंबर गावकरे सरांनी ऑर्डर देऊन सर्वांना रांगेत उभा केले. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची 1999 च्या दहावीच्या हजेरी पत्रकावरून त्या वेळचे वर्गशिक्षक श्री एम बी मुल्ला सर व श्री बी एच पाटील सर यांनी उपस्थित यांची हजेरी घेतली. नूतन हायस्कूल बोराळे यांच्यावतीने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर शाळेच्या आवारातील सुशील सभागृहामध्ये सरस्वती पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नूतन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी भूषवले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपकुमार धनवे, विश्वस्त एस एम पाटील सर व विश्वनाथ पाटील उपस्थित होते. त्यावेळी दिवंगत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर शाळेच्या सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ फेटा व आठवणी मध्ये राहावे असे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा देखील पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन शिक्षक वर्गाकडून सत्कार करण्यात आला. सत्कारनंतर सर्वांनी एकत्र समन्वय साधून शाळेसाठी उपयुक्त अशी एंपलीफायर शाळेला भेट दिली.
त्यानंतर मनोगत कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम विद्यार्थी विद्यर्थिनींनी मनोगताद्वारे शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकानी देखील जुन्या आठवणी, शाळेतील प्रसंगाची आठवण करून देत आपल्या विद्यार्थ्यांविषयी मनोगत व अनुभव कथन केले. शाळेमध्ये सर्वांसाठी भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र जीवनाचा आस्वाद घेतला. भोजनानंतरचा सर्व वेळ विद्यार्थ्यांसाठी गाठी भेटी व गप्पागोष्टी करता राखीव ठेवण्यात आला होता. यामध्ये सर्व विद्यार्थी मुले आणि मुली यांनी सन 1999 नंतर पुढे काय केले. आपली वैयक्तिक माहिती सर्वांना सांगितली. सर्वांच्या चेहऱ्यावर 25 वर्षानंतर समक्ष भेटीची आठवणींचे भाव दिसून येत होते. चहापानानंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करून पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक बी के बिराजदार, डी एन गावकरी, एम बी मुल्ला, बी एच पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक आर के वाघमारे, पर्यवेक्षक सोणगे, संजीव कवचाळे, राजकुमार धनवे, संजय तेली, राजकुमार कोळी, स्वामी, शिखरे, बि के पाटील, मेडिदार, बनसोडे, सौ. कवचाळे मॅडम इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सत्कार समारंभ भोजन व्यवस्था मंडप व्यवस्था स्मृतीचिन्ह बनविणे इत्यादी कामासाठी शाळेचे माजी विद्यार्थी संदीप शिंदे, मधुसूदन बजाज, पवन पाटील, सोमनाथ पाटील, तानाजी जाधव, राहुल पाटील, रजनीश रोकडे, विजय डांगे, अमोगसिद्ध म्हमाने, कुणाल पाटील, दत्ता एडवे, प्रशांत धनवे इत्यादींनी मोलाचे सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. बरेचसे माजी विद्यार्थी दुबई मुंबई पुणे चाळीसगाव सातारा सोलापूर आदि वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शेवटी प्राध्यापक प्रशांत धनवे यांनी आभार मानले.










