news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जतमधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरण ; 14 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा मुख्य संशयित उमेश सावंत अखेर शरण

टीम लोकमन by टीम लोकमन
May 30, 2024
in ब्रेकिंग न्यूज, क्राईम
0
जतमधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरण ; 14 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा मुख्य संशयित उमेश सावंत अखेर शरण

टीम लोकमन मंगळवेढा |

जतमधील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत जि. सांगली) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला.

त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खून प्रकरणात आता जत पोलिस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असे सांगण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी, १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मृत विजय ताड हे मोटार (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला. जत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ताड यांच्या खुनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर. आर. कॉलेजजवळ, जत) या चौघांना अटक केली. पोलिस तपासात चौघांकडून गुन्हयात वापरलेली तीन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅग्झीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

ताड यांचा खून मुख्य सुत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन तसेच नियोजन करुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून २५ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. खुनातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता. उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

बुधवारी उमेश सावंत हा जिल्हा न्यायालयात शरण आला. न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. आता जत पोलिस खून प्रकरणात न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा ताबा घेतली. त्यानंतर खुनाचा तपास करतील.

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

विजय ताड याचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आता उमेश सावंतच्या अटकेनंतरच तपासात खरे कारण उघड होईल. त्यामुळे जत पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

सहकाराला नवे कारभारी ! राज्याच्या सहकार आयुक्तपदी दीपक तावरे यांची नियुक्ती

Next Post

नूतन हायस्कूल बोराळे येथील 1998-99 च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Next Post
नूतन हायस्कूल बोराळे येथील 1998-99 च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

नूतन हायस्कूल बोराळे येथील 1998-99 च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group