टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यावतीने दहावीचा निकाल दि 27 मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. मंगळवेढा येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्तुंग यश मिळवले.
प्रशालेत प्रथम क्रमांक श्रद्धा विनोद शिंदे 93.80 टक्के, द्वितीय क्रमांक शिवम बापूराव पांढरे 92.60 टक्के, तृतीय क्रमांक आयान रफिक पठाण 89.80 टक्के गुण मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी प्रशालेचा निकाल 95.52 टक्के लागला असून ज्यामध्ये 19 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, 32 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 11 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तसेच 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, वर्गशिक्षिका अवंती पटवर्धन, योगेश कुलकर्णी, सुभाष गायकवाड, विठ्ठल जमखंडी, श्रीराम पाटील, राधिका कुसाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी व पालकांनी केलेलं मार्गदर्शन, घेतलेला सराव, विद्यार्थ्यांनी केलेले स्वयं अध्ययनमुळे उत्तुंग यश मिळवले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थाअध्यक्ष प्रा. आर. एन. कुलकर्णी, उपाध्यक्षा निर्मलाताई पटवर्धन, सचिव आप्पासाहेब महालकरी, मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता औताडे तसेच संस्थेचे सर्व संचालक, संचालिका, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










