टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दिनांक 27 मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून यामध्ये दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा इंग्लिश स्कूल, मंगळवेढा प्रशालेनेच बाजी मारली असून प्रशालेचा निकाल 97.80 टक्के लागला. तर 90 टक्केच्या पुढे 76 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
यामध्ये वृषाली दत्तात्रय कोरे या विद्यार्थिनीने (500)100 टक्के गुण मिळवून राज्य, केंद्र व प्रशालेतुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रुती नागेश पाटील हिने (492)98.40 टक्के गुण मिळवून प्रशालेतुन द्वितीय क्रमांक पटकावला तर हर्षवर्धन नागनाथ जोध या विद्यार्थ्याने (490)98 टक्के गुण मिळवून प्रशालेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे. दहावी परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण 503 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 492 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये 90 टक्केच्या पुढे 76 विद्यार्थी तर 80 टक्केच्या पुढे एकूण 143 विद्यार्थी आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक, शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंग्लिश स्कूल, मंगळवेढा प्रशालेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वर्षभर विविध धडपडी राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध तज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते तसेच वर्षभर विविध चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव केला जातो. त्यांच्या प्रत्येक शंकेचे विषय शिक्षकांकडून निरसन केले जाते. त्यामुळेच या प्रशालेचा यशाचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष कदम, संचालिका व अकॅडमीक ऍडमिनिस्ट्रेटर प्रा. डॉ.मिनाक्षी कदम, सचिवा डॉ.प्रियदर्शिनी महाडीक, संचालिका व उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक ॲड.शिवाजी पाटील, प्राचार्य रविंद्र काशिद, उपमुख्याध्यापक सुनिल नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इंग्लिश स्कूल, मंगळवेढा प्रशालेतील 76 विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे गुण मिळवले तर दर्शन दत्तात्रय गायकवाड या विद्यार्थ्यांने गणित विषयात 100 पैकी 100 तर प्रणव पांडुरंग गुंगे या विद्यार्थ्याने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.











