टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 27 मे रोजी दुपारी वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. प्रशालेचा यंदाचा निकाल दरवर्षीप्रमाणे 100 टक्के लागला आहे. यावर्षी प्रशालेत मुलींनी बाजी मारली.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत एकूण पाच विद्यार्थ्यांना 90% टक्क्याहून अधिक गुण प्राप्त झाले असून त्यामध्ये संस्कृती माणिक गुंगे ही 95% गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे. त्यानंतर वैष्णवी केशव शिंदे, आकांक्षा भुजंगराव चेळेकर, विश्वतेज नानासाहेब कोंडुभैरी, प्रीती तानाजी दिवसे या विद्यार्थ्यांना 90% टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत.
दहा विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. यावर्षीचा प्रशालेचा दहावीचा निकाल खूपच कौतुकास्पद लागला आहे. या निकालावरून वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्टा, प्राचार्यांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेची यशस्वी वाटचाल दिसून येत आहे.
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थी हे अभ्यासाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे व सर्वगुणसंपन्न असे आहेत. अभ्यासच नाही तर इतर कला व क्रीडा क्षेत्रात ही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे व शाळेचे नाव मंगळवेढा तालुक्यात अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे.
आज दहावीतील विद्यार्थ्यांचे हे यश पाहून प्रशालेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आनंदाला उधाण आले होते. ही यशाची उंच शिखरे गाठण्यासाठी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्वेसर्वा डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे मार्गदर्शन तर लाभलेच त्याचबरोबर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी खूप कौतुक देखील केले. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.










